हनुमान जयंतीच्या दिवशी ही 5 कामं चुकूनही करु नका, नाहीतर…

आज 16 एप्रिल चैत्र महिन्याची पौर्णिमा त्याच बरोबर भगवान शंकराचा 11वा रुद्रावतार म्हणजेच श्री हनुमानजी यांचा जन्म झाला. या दिवशी देवाची उपासना (worship) केल्याने दुहेरी फळ मिळते. यासोबतच हनुमानजींची पूजा केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्ती मिळून संरक्षण मिळते आणि सर्व प्रकारच्या सुखांसह फलदायी बनते.

पण हनुमानजींची पूजा करताना विशेष खबरदारी घेतली पाहिजे. थोडीशी चूकही केली तर पूजेचे शुभ फळ मिळत नाही. अशा परिस्थितीत हनुमान जयंतीच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी करू नयेत हे जाणून घेऊया.(worship)

हनुमानजींच्या पूजेच्या वेळी लाल, भगवे किंवा पिवळे वस्त्र परिधान करून पूजा करावी. पांढरे किंवा काळे कपडे घालून पूजा करू नका.हनुमानजींना विसरुनही चरणामृत अर्पण करू नये. चरणामृत ऐवजी हरभरा डाळ, गूळ, बुंदीचे लाडू यांचा भोग दाखवावा.

भगवान बजरंगबली हे बाल ब्रह्मचारी आहेत. त्यामुळे या दिवशी एखादी महिला हनुमानजींची पूजा करत असेल तर तिला हात लावू नका. दुरूनच पूजा करणे चांगले राहील.जर कोणाच्या घरी कोणाचा मृत्यू झाला असेल आणि सुतक चालू असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी उपवास किंवा पूजा करू नका आणि मंदिरात देखील जाऊ नका. कारण सुतकाच्या वेळी तुम्ही अशुद्ध असता. त्यामुळे 13 दिवस पूजा करू नये.

आणि जर कुटूंबात मूल जन्माला आले तर मुलाच्या जन्मानंतर 10 दिवस हनुमानजी सोबत इतर कोणत्याही देवाची पूजा करू नये. हनुमानजींची पूजा करण्यापूर्वी काही खाल्ले असेल तर प्रथम तोंड पूर्णपणे स्वच्छ करा. उष्ट्या तोंडाने कधीही त्याची पूजा करू नका.

हेही वाचा :


आजचे राशी भविष्य

Leave a Reply

Your email address will not be published.