२८ फेब्रुवारी – दिनविशेष

२८ फेब्रुवारी रोजी झालेल्या घटना.

१८४९: अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले.

१९२२: इजिप्तला युनायटेड किंग्डमपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९२८: डॉ. सी. व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

१९३५: वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध लावला.

१९४०: बास्केटबॉल खेळ प्रथमच टेलेव्हिजन वर प्रक्षेपित झाला.

 

२८ फेब्रुवारी रोजी झालेले जन्म.

१८७३: सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९५४)

१८९७: मराठी ग्रंथकार डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७४)

१९०१: रसायनशास्त्रज्ञ लिनस कार्ल पॉलिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑगस्ट १९९४)

१९२७: भारताचे १० वे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै २००२)

१९२९: भारतीय-अमेरिकन संशोधन रंगास्वामी श्रीनिवासन यांचा जन्म.

१९४२: द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक ब्रायन जोन्स यांचा जन्म. (मृत्यू: ३ जुलै १९६९)

१९४४: संगीतकार व गीतकार रविन्द्र जैन यांचा जन्म.

१९४८: ग्वाल्हेर-किराणा-जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका विदुषी पद्मा तळवलकर यांचा जन्म.

१९५१: भारतीय क्रिकेटपटू करसन घावरी यांचा जन्म.

 

२८ फेब्रुवारी रोजी झालेले मृत्यू.

१९२६: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १८७४ – नाशिक)

१९३६: पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू यांचे निधन. (जन्म: १ ऑगस्ट १८९९)

१९६३: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांचे निधन. (जन्म: ३ डिसेंबर १८८४)

१९६६: आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार उदयशंकर भट्ट यांचे निधन. (जन्म: ३ ऑगस्ट १८९८)

१९६७: टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक हेन्री लूस यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १८९८)

१९८६: स्वीडनचे २६ वे पंतप्रधान ओलोफ पाल्मे यांची हत्या. (जन्म: ३० जानेवारी १९२७)

१९९५: कथा, संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १९१४)

१९९८: अभिनेता राजा गोसावी यांचे निधन. (जन्म: २८ मार्च १९२५)

१९९९: औध संस्थानचे राजे भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी यांचे निधन.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.