प्रेमप्रकरणात जवळीक वाढेल, आजचा दिवस झक्कास..!

ज्योतिषशास्त्रानुसार, (according to astrology) प्रत्येक व्यक्तीची रास त्याच्या जन्मतारीख आणि जन्मवेळेवर आधारित असते. ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्र, 9 ग्रह आणि 12 राशींचे वर्णन केले आहे. याआधारावर व्यक्तीची रास (Zodiac) ठरवली जाते. आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? आजचे तारे काय म्हणतात? दैनिक राशिभविष्याद्वारे आजचे राशीभविष्य आणि संपूर्ण दिवसातील घडामोडींची माहिती जाणून घेवूया.

हे राशीभविष्य (Horoscope) वाचून तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकाल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानां चा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनंदिन राशीभविष्य वाचून तुम्ही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता.

मेष –
वेळ अनुकूल आहे. ग्रह तुम्हाला खूप काही चांगलं देण्याचा प्रयत्न करत आहेत. आत्मविश्वास निर्माण होईल. तुमच्या कार्यक्षेत्रास प्रगती होईल. तरूणांच्या मनाप्रमाणे कामं होतील. पण, कोणाच्या तरी बोलण्यात येऊन कामात कमी पडू शकता. त्यामुळे काही संधी हातातून जाऊ शकतात. ज्यामुळे नुकसान होण्याची शक्यता. निर्णय फसू शकतात. ऑफिस मध्ये समस्या निर्माण होतील पण, संयम ठेवा. वेळेनुसार परिस्थिती बदलत जाईल. व्यवसायात प्रगती कमीच. वर्तमान स्थितीवर जास्त लक्ष द्या.(according to astrology)

लव फोकस – प्रेमप्रकरणात जवळीक वाढेल. त्याने मन प्रफुल्लित राहिल.

खबरदारी – प्रकृती ठीक राहील. वातावरणामुळे डोकं दुखीची समस्या जाणवेल. काळजी करू नका.

शुभ रंग – गुलाबी

भाग्यवान अक्षर – र

अनुकूल क्रमांक – 5

वृषभ –
दिवसाच्या सुरवातीलाच महत्वपूर्ण कामा संबंधी योजना तयार करा. कारण दुपार नंतर परिस्थिती तुमच्यासाठी खूपच चांगली आहे. तुमची कामं चांगली होतील. मुलांच्या बाबतीत चांगली बातमी मिळाल्याने मन प्रसन्न राहील. पण, ओव्हर कॉन्फिडंस आणि इगोमुळे मित्रांसोबत संबंध बिगडू शकतात. कुंटूबातील वृद्धांची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांची काळजी घ्या. विद्यार्थ्यांना कोणत्यातरी विषयात त्रास होऊ शकतो. कार्यक्षेत्रात ऑर्डर संबंधित कोणती तक्रार आल्याने नुकसान होऊ शकते. त्यामुळे तिथे कर्मचारी तसंच सामानाची क्वालिटी यावर पूर्ण नजर ठेवा. नोकरदार व्यक्तींनी लक्ष द्या काम चुकीचे झाल्याने सिनियर अधिकारी नाराज होऊ शकतात.

लव फोकस – घर परिवारातील लोकांसोबत वेळ घालवा. त्याने वातावरण चांगले राहील. व्यर्थ प्रेम प्रकरणात वेळ घालवू नका.

खबरदारी – खांदेदुखी जाणवेल. ज्यासाठी व्यायाम आणि योग हाच एकमेव इलाज आहे.

शुभ रंग – मरून

भाग्यवान अक्षर – र अनुकूल क्रमांक – 6

मिथुन –
स्वत: मधील सुप्त गुण ओळखा आणि त्याचा वापर करा. सध्याची ग्रहस्थिती तुमच्यासाठी चांगली आहे. आज धनदायक स्थिती असेल. त्याचबरोबर यावेळी केलेल्या योजनांचा भविष्यात फायदा होईल. पण, योजना लवकर आमलात आणा. जास्त विचार करू नका त्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. बाहेरच्या व्यक्तीचा हस्तक्षेप तुमच्यासाठी त्रासाचे कारण बनू शकते. व्यवसायात कामामध्ये काही बदल घडवून आणणं गरजेचं आहे. त्याचबरोबर स्टाफ आणि कर्मचाऱ्यांवर बारीक लक्ष ठेवा. नोकरदार व्यक्तींच्या प्रगतीचे योग आहेत.

लव फोकस – वैवाहिक जीवनात वैचारिक मतभेद होऊ शकतात. पण, परिस्थिती तुम्हाला संभाळावी लागेल,

खबरदारी – कामाच्या बाबतीत आरम घेणं आवश्यक आहे.

शुभ रंग – लाल

भाग्यवान अक्षर – अ

अनुकूल क्रमांक – 1

हेही वाचा :


आजचे राशी भविष्य

Leave a Reply

Your email address will not be published.